मुंबई : शासकीय कर्मचारींचे सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे 60 वर्षे करण्याबाबत अधिकारी महासंघाची गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अनुकुलता दर्शवली. राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत भूषण गगराणी तर अधिकारी महासंघाच्यावतीने संस्थापक व. दि. कुलथे; अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर उपस्थित होते.
या सोबतच निवृत्तीच्या वयात वाढ करू नये अशी देखील मागणी करणारे पत्र मुत्र्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. दरवर्षी तीन टक्के कर्मचारी निवृत्त होतात. 16 लाख कर्मचाऱ्यांत दरवर्षी 48 हजार नोकऱ्या निर्माण होतात. जर निवृत्तीवय दोन वर्षाने वाढवले तर 96000 म्हणजे एक लाख नोकऱ्या निर्माण होतात त्या तरुणांना मिळणार नाहीत. त्यामुळे राज्यातील लाखो सुशिक्षित बेकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळणारा हा निर्णय आहे. अशा आशयाचे पत्र सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.