नंदुरबार (प्रतिनिधी) प्रसिद्ध शिर्डी साई संस्थानच्या 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे न्याय मागण्यासाठी गुरुवार दि. 6 एप्रिल रोजी शिर्डी येथे लक्षवेधी सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने पाठिंबा दिलाअसल्याचे राज्य उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी सांगितले.सन 2004 च्या अधिनियमानवे 1052 कर्मचाऱ्यांप्रमाणे शिर्डी संस्थानच्या सेवेत कायम करण्याबाबत 598 कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार व्हावा.यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी दिली.