तळोदा दि ७(प्रतिनिधी)
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 18 संचालक मंडळाच्या जागांसाठी 86 नामांकन दाखल झाले होते. छाननी त 9 नामांकन अवैध ठरले आहे.77 नामांकन वैध ठरले आहे.
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंच वार्षिक संचालक मंडळाची निवडणूक होत आहे 18 जागांसाठी 86 नामांकन दाखल झाले होते. नामांकन छाननीत 9 नामांकन पत्र उडाले असून अवैध ठरविण्यात आले . सोसायटी मतदार संघात इतर मागासवर्ग प्रवर्ग गटात अजय छबूलाल परदेशी यांचे नामांकन रद्द झाले आहे.
ग्राम पंचायत मतदार संघात अनुसूचित जाती जमाती राखीव जागेत सुभाष मानसिंग वळवी, दीपक दशरथ वळवी, प्रवीण भुलसिंग वळवी, वासंती नरहर ठाकरे, सर्वसाधारण गटात गौतम प्रभू भिलाव, नम्रता धनराज मराठे, सोसायटी संस्था मतदार संघात सर्वसाधारण महिला राखीव गटात सुरेखा दिलीप पाटील 2 नामांकन,