संपादकीय
तळोदा दि ८ देवमोगरा पूनर्वसन अक्कलकुवा येथे बिबट्याने सातवर्षीय बालकाला फरफटून नेले.बालकावरील हल्ला जीवितहानीस कारणीभूत ठरला.दोन दिवस समाज माध्यमातून चर्चा 'दु:ख, संताप व्यक्त झाला.या घटनेला जबाबदार कोण?याची जबाबदारी निश्चित करावी.प्रशासनाने कायदेशीर आणि दिखाऊ सोपस्कार पार पाडले.
बिबट्याने हल्ला केल्याची घटना पहिल्यांदा घडलेली नाही.तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात या घटना वारंवार घडत आहेत.कूत्रा, कोंबडी,शेळी,गाय,बैल, आदींवर हल्ला ही नित्याचीच बाब झाली आहे.पशू ,जनांवरांपर्यत हल्ले ठिक होते,पण कधीपासून माणसांवरच हल्ले आणी ते ही मृत्युमुखी पाडणारे,यावर कोणी बोलेल का? मोर्चा काढेल, कां? माणसांच्या सूरक्षेची हमी घेईल का? हे असेच चालायचे? घटना घडली की सांत्वनासाठी जायचे,तोडकी मोडकी मदत द्यायची,फोटो सेशन करायचे, आणि आपण खूप काही केल्याचा आव आणायचा.शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून यावर ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
बिबट्याने जनावरांवरून आता आपला मोर्चा माणसांकडे वळवला आहे.विशेषता बालकाना टार्गेट केले आहे.मागे रोझवा पूनर्वसन येथे बालक आई सोबत गूरे चारायला गेला असताना त्याला फरफटून नेले होते.बिबट्याचे माणसांवरील हल्ले भितीदायक आणि विचार करायला लावणा-या घटना आहेत.
बिबट्या ही वन विभागाची संपदा आहे.त्याला कोणी,शिकार, मारहाण केली तर कायद्याने गून्हा ठरतो.वन्यप्राण्याची देखभाल, संरक्षण वनविभागाची जबाबदारी आहे.त्यांना अधिवासात ठेवणे ही जबाबदारी वनविभागाची आहे.माणसांवर हल्ले होत असताना,प्राण गमवावे लागते आहे मात्र वनविभाग ठोस पाऊले उचलायला तयार नाही.वन्यप्राणी जंगले नष्ट झाल्यामूळे भक्ष्य शोधण्यासाठी गाव वस्त्याकडे वळले आहेत.हे निर्विवाद सत्य आहे.मात्र त्यादृष्टीने वन विभाग नियोजन करायला तयार नाही.त्यामुळेच लहानशा बालकाला जीव गमवावा लागला आहे.
मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या पालकाला शासनस्तरावर, समाजातून आर्थिक मदतही मिळेल.ती मदत गरजा पूर्ण करू शकते.पण जो बालक या जगात आला आणि जग कसे आहे, जीवन कसे जगतात, जगातले व्यवहार पाहण्या आधीच जगाचा निरोप घेऊन गेला.इतकी दूर्देवी घटना सर्वाच्याच मनाला चटका लावून गेली.बिबटयांचा स्वैराचार दिवसेंदिवस मानवी जीवनाला धोकेदायक ठरत असताना शासन प्रशासन बघ्याची भूमिका पार पाडत आहे.ही बाब समाजाला चिंतन करायला लावणारी आहे.
बिबट्या,अस्वल, वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्याची, जबाबदारी वनविभागाची आहे.माणसावर,पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले की, वनविभाग काय करते? पंचनामा करण्याचे सोपस्कार पूर्ण करते,गाव पाड्यात दवंडी पिटते, रात्री एकटे फिरू नका.मात्र या हल्ल करून माणसांना बेजार करणा-या प्राणांतिक हल्ला करणा-या प्राण्यांचा बंदोबस्त कधी केला आहे का? हा प्रश्न अनूत्तरीत आहे.या बाबत जबाबदारी निश्चित केली पाहिजे अशी मागणी होत आहे.