तळोदा दि15 जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्या संकल्पनेतून बालविवाह रोखण्यासाठी अक्षता मोहीम अंतर्गत बालविवाह केल्याने होणाऱ्या दुष्परिणाम बाबत रतनपाडा गावी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत बाल विवाह रोखणे, बाल विवाह केल्याने महिलांना होणारा त्रास, महिलांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम, यांची माहिती देण्यात आली. मुलींचे लग्न 18 वर्षांच्या आत केल्याने त्यांचे शरीराची वाढ होत नाही त्यामुळे जन्माला येणारे बाळ कुपोषित येते. म्हणुन मुलींचे लग्न18 वर्ष व मुलाचे 21 वर्षे पुर्ण झाल्यावर करणे. बालविवाह केल्याने महिलांचे शरीराची पूर्ण वाढ झालेली नसल्याने जन्माला येणारे बाळ कुपोषित होते व कुपोषण वाढते. बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह केल्याने होणाऱ्या शिक्षेबाबत माहिती देण्यात आली. बाल विवाह रोखण्यासाठी गाव पातळीवर अक्षता समिती गठीत करण्यात आली असुन त्यात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, पोलीस अंमलदार यांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच अंमली पदार्थ सेवन केल्याने होणाऱ्या दुष्परिणाम बाबत माहिती देण्यात आली आहे.
या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, पोलीस ना. अजय कोळी, पोलीस कॉ. अनिल पाडवी, श्री अंतु दिलीप वळवी सरपंच रतनपाडा, श्री मुनेश पाडवी उपसरपंच, श्री राजेंद्र तडवी पोलीस पाटील, सौ.लक्ष्मीबाई वळवी अंगणवाडी सेविका, कारभारी आदि सह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.