Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चांदसैली घाटात अपघातात मृत्यू झालेल्यांचा कूटंबियांना पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी भेटुन सांत्वन केले

चांदसैली घाटात वावी ता धडगाव अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांचा भेटसाठी पालकमंत्री डॉ गावित 

धडगाव दि २५(प्रतिनिधी) कोठार धडगाव रस्ता दरम्यान चांदसैली घाटात झालेल्या अपघाताच्या हृदयद्रावक घटनेत चार जणांचा मृत्यू व तीन जण गंभीर जख्मी झाले होते.या घटनेमुळे जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहे.वावी ता.धडगाव येथिल एकाच गावातील घरातले कर्ते पुरुष अचानक सोडुन गेल्याने कुटुंब व गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अशा अचानक झालेल्या घटनेने शासकीय यंत्रणा तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कार्यरत असते. शासकीय यंत्रणेसोबतच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित अपघातामध्ये मयत झालेल्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली. झालेल्या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली.
               मयताच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त शासकीय मदत करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.तसेच पुन्हा चांदसैली घाटात अशा घटना होऊ नये. यासाठी सुरक्षा कठडे व वळण रस्ता दुरुस्तीचे काम त्वरित लावण्याचे आदेश पारन्वित करू असे सांगितले. वावी येथील ग्रामस्थांनी पाणीटंचाई विषयीचाही पाढा पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्यापुढे वाचला त्यावर गावित यांनी सांगितले की,वावी गावातील पाणी प्रश्न त्वरित सोडवण्यात येईल.
पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्यासोबत धडगावचे शिवाजी पराडके व तळोदाचे माजीनगरसेवक रामानंद ठाकरे आदी होते.