आमदार आमशादादा पाडवी यांनी विधान परिषदेत निवडून आल्यापासून अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न सूरू केले असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कडे प्रवेशार्थींचा कल वाढला असून ग्रामीण भागातील नेतृत्व आमदार आमशादादा पाडवी यांचे नेतृत्व स्वीकारत प्रवेश करीत आहेत.यावेळी पक्ष प्रवेश करणा-या स्त्री पुरुषांचा सत्कार करण्यात आला.
अक्कलकुवा तालुक्यात आमदार आमशादादा पाडवी यांच्या नेतृत्वात उबाठा शिवसेनेत इतर पक्षीय कार्यकर्त्यांचा प्रवेश
May 25, 2023
अक्कलकुवा दि २५(प्रतिनिधी) अक्कलकुवा तालुक्यातील सोनापाटी ग्राम पंचायतचे सदस्य श्री आत्माराम गोन्या पाडवी व त्याचे सहकारी सदस्य चार असे सर्व पाच सदस्य व शंभर ते दिडसे कार्यकर्ते सोनापाटी व खटकुवा येथील महिला व पुरुषांनी कांग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदार आमश्या दादा पाडवी साहेब यांच्या नेतृत्वात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.