नंदुरबारच्या देवरे दाम्पत्यांचा झेंडा अटकेपार,
रेल्वेत बेबी बर्थच्या दुसऱ्या चाचणीला लवकरच सुरुवात
नंदुरबार दि १६ (प्रतिनिधी) रेल्वेने प्रवास करताना सातत्याने लहान बाळासोबत असलेल्या मातेला अडचणींचा सामना करावा लागत होता.रेल्वेतील सीटवर जागेच्या कमतरतेमुळे मातेला बाळासोबत झोपण्यासाठी गैरसोय होत असे. हि समस्या लक्षात घेऊन नंदुरबार येथील प्रा. नितीन देवरे व हर्षाली देवरे या दांपत्याने अनोख्या पद्धतीने रेल्वेतील बेबी बर्थ तयार केला. लखनऊ मेल मधील पहिल्या चाचणीच्या फीडबॅक व सोशल मीडियाच्या सूचनांचा विचार करून बेबी बर्थचा नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. यासंदर्भात नुकतीच नवी दिल्ली येथे प्रा. नितीन देवरे व रेल्वे बोर्डातील अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. त्यामुळे दुसऱ्या चाचणीनंतर लवकरच भारतीय रेल्वेत बेबी बर्थ नवीन रूपात पाहायला मिळणार आहे.
सध्या रेल्वेच्या आसनावर कमी जागा असल्यामुळे आई आणि बाळाला सोबत प्रवास करणे अडचणीचे ठरत होते.ही समस्या लक्षात घेऊन देवरे दांपत्यांनी बेबी बर्थचा आराखडा तयार केला होता. हि समस्या लक्षात घेऊन प्रा. नितीन देवरे व हर्षाली देवर यांनी गेल्या वर्षीच फोल्डेबल बेबी बर्थ बाबत संशोधन केले होते. त्यानंतर या प्रकल्पाचे सादरीकरण योजक चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जी -20 अंतर्गत येणाऱ्या लाईफ- 20 चे राष्ट्रीय समन्वयक डॉ. गजानन डांगे यांना दाखवला. त्यानंतर राज्यसभा खासदार आणि रेल्वे संसदीय समितीचे सदस्य सुमेरसिंग सोलंकी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून माहिती दिली. यानंतर लगेच नंदुरबारचे प्रा. नितीन देवरे यांना दिल्लीत पाचरण करण्यात आले. तेथे देवरे यांनी रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांसमोर बेबी बर्थचे सादरीकरण केले. या सादरीकरणातून रेल्वेमंत्री वैष्णव प्रभावित झाले.त् यांनी तात्काळ प्रायोगिक तत्त्वावर बेबी बर्थ हा प्रकल्प राबविण्याबाबत रेल्वे विभागाला आदेशित केले. गतवर्षी मे 2022 मध्ये लखनऊ ते दिल्ली लखनऊ मेलमध्ये बेबी बर्थची चाचणी करण्यात आली.दुसऱ्या चाचणी मधील बेबी बर्थची सुरक्षा म्हणुन काही बदल करण्यात आला आहे. रेल्वेतील वरच्या सिटवरुन काही खाली पडल्यास सुरक्षा पडदा लावण्यात आला आहे.
प्रा. नितीन देवरे येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सेवार्थ असुन हर्षाली देवरे या गृहिणी आहेत.
संस्थेचे चेअरमन अड. रमणलाल शाह, सचिव डॉ. योगेश देसाई, प्राचार्या सुषमा शाह व मनीष शाह यांनी प्रा. नितीन देवरे यांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले.