शिरपूर दि २५(प्रतिनिधी) कू द्वेता भूपेशभाई पटेल च्या वाढदिवस निमित्त संजय डोंगरसिंग पावरा शास्त्रीनगर पावरावाडा बोराडी ह्या अपंग युवकासह द्वेतादिदी च्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील अकरा जणांना चारचाकी ई- स्कूटर बाईक देण्यात आली.यासाठी मा अमरिशभाई पटेल, मा भुपेशभाई पटेल,मा चिंतनभाई पटेल, कू द्वेतादिदी पटेल उपस्थित होते.
मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत 'राजगोपाल भंडारी हॉल', आर. सी. पटेल मेन बिल्डींग येथे समारंभपूर्वक शिरपूर शहर व तालुक्यातील ११ दिव्यांगांना मोफत ई- मोटर सायकल भेट स्वरुपात देण्यात आले. तसेच कू. द्वेता पटेल यांच्या वजना एवढे लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कु. द्वेता भूपेशभाई पटेल आमदार काशिराम पावरा, तहसीलदार महेंद्र माळी, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उदयपूर येथील डॉ. बन्सीलाल शिंदे, धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के. डी. पाटील, सुभाष कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे, सी. पौर्णिमा पाठक उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यावेळी म्हणाले, आदिवासी भागात कु.द्वेता दिदीने खूप काम केले असून तिचा आम्हाला अभिमान आहे. कु. द्वेता पटेल व सौ. कृतिबेन पटेल यांनी मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजू, गोरगरीब यांच्यासह महिला व युवतींसाठी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सेवा ,अनेक महिला व तरुणींना पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करत असल्याची बाब कौतुकास्पद आहे.
कु द्वेता पटेल यांच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत ११ गरजू दिव्यांगांना ई-मोटर सायकल मोफत वाटप करुन अभिनव पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास योजना परिविक्षा अधिकारी डी. एस. लांडगे यांनी शासकीय योजना ,
शुभ मंगल सामुदायिक विवाह सोहळा, माझी कन्या भाग्यश्री व बाल संगोपन याबाबत सविस्तर माहिती देऊन या योजनांचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविकात सुभाष कुलकर्णी म्हणाले, कु. द्वेता पटेल यांनी आतापर्यंत तालुक्यात अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले. कमी वयात त्यांचा समजूतदारपणा प्रेरणादायी व आदर्शवत आहे. पटेल परिवाराचा सुसंस्कृत वारसा घेता पटेल पुढे नेत असल्याची बाब शिरपूर तालुक्यासाठी अभिमानास्पद व भूषणावह आहे. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. पौर्णिमा पाठक यांनी केले. लाभार्थी दिव्यांग बंधू- भगिनींनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमात पटेल परिवाराचे आभार दिले. कार्यक्रमाला मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टचे सौ. पौर्णिमा पाठक, डॉ. सुप्रिया पंतवैद्य, डॉ. श्वेता बेलगमवार, डॉ. गजानन पाटील, संजय चौधरी, भालेराव माळी, धीरज माळी, स्वीय सहाय्यक सुनिल जैन, स्वीय सहाय्यक योगेश्वर माळी, भैरव राजपूत उपस्थित होते.