सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क
मूंबई दि१८ - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांच्यावर कारवाई केली आहे. मनिषा कायंदे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकनाथ शिंदे यांच्याकडून धक्का देण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशापूर्वीचं उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मनिषा कायंदे यांची प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे. कायंदे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन प्रा. मनिषा कायंदे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलं आहे. प्रा.मनिषा कायंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली