Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नागपूर येथे आशिष देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश

सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि१८ जुन
            काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख यांच्या भाजपात प्रवेश. भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष देशमुख 18 जून रोजी भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. नागपूर जवळच्या कोराळी येथील नैवेद्यम सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
               त्यांनी जाहीर सांगीतले की, मोदींच्या कामावर विश्वास ठेवून मी भाजपात प्रवेश करीत आहे.मला २०२४ ची निवडणूक लढवायची नसून पक्ष संघटनेत काम करायचे आहे.यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आम्ही त्यांना पक्षात योग्य ते स्थान देऊ.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप शासनातील नऊ वर्षांच्या कालावधीतील केलेल्या कामांचा आढावा मांडला, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी,दलित, ओबीसी यांच्यासाठीचा योजना व मिळणारा प्रतिसाद यांची माहिती देत देशातील शेवटच्या गरीबापर्यंत जाऊन भारतातून समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.