तळोदा दि १६ (प्रतिनिधी )नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागत धडगाव तालुक्यातील कुंडल- मालपाडा येथे राष्ट्रीय मशरूम दिवस साजरा करण्यात आला.
अतिदुर्गम भागातील वाढती बेरोजगारी, व वाढते स्थलांतर थांबण्यासाठी जिल्ह्यात व आपल्या परिसरात रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. मशरूम शेती हा भारतात खूप कमी प्रमाणात केला जाणारा व्यवसाय आहे मशरूम शेती करून आपणं आपले भविष्य घडवू शकतो असे संदीप दादा (सरपंच कात्री) यांनी सांगितले.
राजेंद्र दहातोंडे ह्यांनी गावाला आर्थिक व सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून,रोजगार निर्मिती करून,गावातले स्थलांतर थांबवण्यासाठी गावातील सरपंच, पोलीस पाटील, यांनी करावे असे मत व्यक्त करण्यात आले.
तसेच सातपुड्यातील युवकांना प्रकृतीने खूप साधने दिली आहेत.. त्यातून आपल्याला रोजगारनिर्मिती स्वतः करून इतर राज्यात जाऊन मजुरी टाळण्याचे आवाहन रामसिंग दादा यांनी केले.
तसेच डॉ.वंजीत पाडवी यांनी कॅन्सर, शुगर, डायबिटीज,मंदबुद्धी, अशा मोठमोठ्या आजारांवर मशरूम हे प्रभावशाली औषध असून प्रत्येकाने दैनंदिन जीवनात मशरूम, मशरूमचे पावडर किंवा ड्राय मशरूम आपल्या गरजेनुसार सेवन करावे असे सर्वांना आवर्जून सांगितलं आहे.तथा सर्व मान्यवरांच्या हस्ते मशरूम शेतीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे राजेंद्र दहातोंडे (केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र कोळदा नंदुरबार) संदीप दादा वळवी (सरपंच कात्री), रामसिंग दादा वळवी (सामाजिक व राजकीय क्षेत्र बगर उत्पादक संचालक) राजेंद्रजी वसावे (मशरूम शेती व्यवसायिक मार्गदर्श, लीलाताई वसावे (मशरूम शेती मार्गदर्शक) विनोद पाडवी (सरपंच मुंदलवड) योगेश पाडवी (सरपंच कुंडल) डॉ.वंजीत एस.पाडवी, डॉ. कविता पाडवी, अर्जुन वळवी सिसा, किशोर वळवी (मांडवी) सर्व आरोग्य दूत व मशरूम शेती उत्पादक या कार्यक्रमात शोभा वाढवली बाहेर गावातील तसंच गावातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने. उपस्थिती दिली आणि या शिबिराचे ज्ञान घेतले.