Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आदिवासीबद्दल दिखाऊ प्रेम, मोदींनी मोठ्या उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपये माफ केले, गोरगरीबांकडे लक्ष द्यायला मोदींना वेळ नाही - काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी

नंदूरबार, दि.११ (प्रतिनिधी) प्रभू श्रीराम कुठे अन् नरेंद्र मोदी कुठे ? असा प्रश्न करीत काँग्रेसच्या महासचिव न प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर हल्लाबोल करत सभेला सुरुवात केली.
             देशात अन्याय होतो तेव्हा मोदी गप्प बसतात. शबरी मातेवर बोलणारे मोदी महिला क्रीडापंटूंवर अन्याय, मणिपूरच्या महिलांवर लैंगिक अत्याचार होतो तेव्हा बोलत नाही.असा आरोप प्रियंका गांधी यांनी नंदूरबारच्या सभेत केला.
        नंदूरबार येथे शनिवारदि. ११रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांची सभा महा आघाडीचे उमेदवार अँड गोवाल के पाडवी यांच्या प्रचारासाठी झाली. यावेळी त्या बोलत होत्या, मोदींनी मोठ्या उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपये माफ केले. स्वत:साठी विमान घेतलं. पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. देशातील खरबपतींचे ते मसीहा आहेत.
          मोदींना दहा वर्ष झाली आहेत.आता बदलायची वेळ आली आहे.विकास तर दुर . महागाई वाढली, यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सरकार बदलेपर्यंत आम्ही बोलत राहणार. काँग्रेसची गॅरंटी आहे. आम्ही सर्व आश्वासन पूर्ण करणार, गोरगरीबांना आम्ही २५ लाखापर्यंत उपचार मोफत करणार, कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ महिलेच्या खात्यात एक लाख रुपये देणार, पदवीधरांना नोकरी, आमची सत्ता आल्यावर आम्ही देशातील ३० लाख पदे भरणार, परीक्षा शुल्क माफ करणार , पिकांना किमान मूल्य देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी साठी आयोग स्थापन करणार,शेती व्यवसायातील जीएसटीची जाचक अट रद्द करणार, अशी आश्वासने प्रियंका गांधी यांनी दिली. 

          देशातील गरीब खचला आहे. त्याला उत्पन्नाचे साधन नाही,शेती करणे कठीण झालं, पण मोदींना हे कळत नाही. त्यांना कोणी सांगण्याची हिम्मत करीत नाही. अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात काय केले? असा प्रश्न उपस्थित करत जे काँग्रेसने निर्माण केले ते मोदींनी मित्रांना विकले, आदिवासींसाठी काँग्रेसने अनेक योजना सुरु केल्या, राहुल गांधी ज्यांनी ४ हजार किलोमीटरची पायी यात्रा केली आहे. काँग्रेसचा पाया गांधी विचारांचा आहे. लोकशाहीत जनता सर्वोतोपरी असते. पण भाजपची विपरीत विचारधारा आहे. आदिवासी संस्कृतीचा आदर भाजप करीत नाही, ते संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
           ज्या वेळी आदिवासींवर अन्याय होतो त्यावेळी भाजप गप्प राहते. आदिवासींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. भाजपने एकमेव आदिवासी मुख्यमंत्री सोरेन यांना जेलमध्ये पाठवल्याचा आरोप केला.
     मोदी देशातील गरिबांबद्दल बोलतात एक आणि करतात दुसरेच. भाजप सतत आदिवासींचा अपमान करत आहे. देशात २२ लाख आदिवासींना जमीन पट्टे दिले नाहीत. मोदी सांगतात शबरीचा पुजारी आहे. पण देशात शेकडो शबरींचा अपमान केला जातं आहे, तेव्हा मोदी का गप्प ? , असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
       सर्व सत्ता, साधने, मोदींकडे आहे. मग आपण एकटे कसे लढत आहेत ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात काय केले ? हे सांगण्याची हिंमत त्यांच्यात नाही. त्यांना हिंमत हवी असेल तर त्यांनी इंदिरा गांधींकडून शिकावं. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे देखील दोन तुकडे केले, अशी हिंमत दाखवा. त्यांच्याकडून काहीतरी शिका, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींवर केला.
        गरिबांकडे अनेक समस्या आहेत. त्यांच्याकडे मोदी स्वतःच्या समस्या मांडतात. मोदी यांचा संपर्क जनतेशी तुटला आहे. गेल्या दहा वर्षात मोदींचा एका आदिवासीसोबत फोटो नाही. एकदाही आदिवासी सोबत आले नाहीत. मोदींनी देशात
 सत्तेसाठी राजकारण केले जाणारी व्यवस्था निर्माण केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडले. पैसे देऊन लोकशाही विरोधात सत्तांतर केले. आम्ही मोदींप्रमाणे सत्ता बदल करणार नाही. मोदींनी देशाची संपत्ती सर्व श्रीमंत मित्रांना देऊन टाकली. प्रियंका गांधी यांच्या सभेला लाखांवर गर्दी होती.