या कार्यक्रमात प्रदेश अध्यक्ष आरिफ अली मंसूरी मुंबई यांचे अध्यक्षतेखाली सुमारे पाच जोडप्यांचे लग्न लावून(निकाह)चे कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमात विवाह (निकाह) हजरत मौलाना इनायतुल्ला ईखरवी यांच्या हस्ते विवाह (निकाह) संपन्न झाले बोलताना ते पुढे म्हणाले की सामूहिक विवाह ही काळाची गरज बनली आहे यात गोरगरिबांचे पैसे वाचतात हे चांगले सामाजिक उपक्रम असून नवापूरच्या आदर्श सर्वांनी घ्यावे बोलताना पुढे ते म्हणाले भारत हे देश सर्व धर्म संपन्न देश आहे या देशात राष्ट्रीय एकात्मता बंधुभाव आजपर्यंत टिकून आहे माझ्या या भारत देशात हिंदू मुस्लिम सिख ईसाई हा नारा कायम आहे शहराची शांतता टिकून राहावी अशी मी अल्ला (परमेश्वर ) जवळ प्रार्थना करतो आमचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्ला हो अली ही वसल्लम जो संदेश जगात शांती राहावी याच्या सर्व बांधवांनी प्रयत्न करावे यावेळी गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश या राज्यातील समाजबांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमास नवापूरचे आमदार शिरीष नाईक, डोकोरे साखर कारखान्याचे चेअरमन भरत भाऊ गावित,हाजी कलीम मंसूरी अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र मन्सुरी पिंजारी धुळे, माजी जिल्हाध्यक्ष हाजी नईम मंसूरी नंदुरबार, जळगाव जिल्हाध्यक्ष हाजी अख्तर मंसूरी, नासिक जिल्हा अध्यक्ष आयनुद्दीन शेख, पुना येथील अश्फाक मंसूरी, शहादा येथील डॉक्टर रिजवान, डॉक्टर किस्मत शेख, आरिफ मासूम पिंजारी, मजाज शेख, नबी आप्पा पिंजारी, नजीर शेख, नासिर पिंजारी,आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी साठी जुबेर मंसूरी, अध्यक्ष शकील मंसूरी, उपाध्यक्ष रियाज मन्सुरी ,सचिव रियाज मन्सुरी ,सहसचिव शकील मंसूरी ,खजिनदार इमरान मंसूरी, सदस्य अजगर मंसूरी, अल्ताफ पिंजारी , अल्तामश मंसूरी , शोएब मंसूरी, इरफान मन्सुरी, अरबाज मंसूरी , महेमुद मंसूरी, अख्तर मंसूरी , डॉक्टर लाला मंसूरी ,साजिद मंसूरी यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक आय जी पठाण यांनी केले