नंदुरबार (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील जागृत भद्रा मारुती प्रमाणेच
नंदुरबारत देखील निद्रावस्थेतील भद्रा मारुती चे मंदिर आहे.हनुमान जयंती निमित्त आज गुरुवारी पातोंडा शिवारातील भद्रा मारुती मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांसह महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार शहरातील कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पातोंडा शिवारातील निद्रा अवस्थेतील भद्रा मारुती मंदिरात सध्या भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे.नवसाला पावणाऱ्या या भद्रा मारुतीची मूर्ती स्वयंभू असून निद्रावस्थेत आहे.सुमारे 23 वर्षांपूर्वी म्हणजे सन 2000 मध्ये श्रद्धाळू भाविक अशोक विठ्ठल पाटील यांनी शेत परिसरात मंदिराची उभारणी केली.जंगल सदृश्य भागात असलेल्या मंदिरावर रामनवमीनिमित्त भगवे ध्वज लावण्यातत आले असून मंदिराचा कळस लांबून लक्ष वेधून घेतो.मंदिर परिसरात नागरी वसाहत नसली तरी या ठिकाणी पर्यटनासाठी भाविकांची वाढती गर्दी आहे. मंदिराच्या सुरक्षेतेसाठी पाटील परिवारातर्फे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह वीज आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.आज गुरुवार दि. 6 मार्च रोजी हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंतत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक राजू पाटील व परिवाराने केले आहे.