मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे प्रमुख धिरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी अखेर साईबाबा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी ट्विटरनंतर माफी मागितली आहे. बागेश्वर धामकडून याबाबत अधिकृत माफीनामा जाहीर करण्यात आला आहे. यात त्यांनी आपल्या वक्तव्यामुळे इतरांच्या मनाला त्रास झाला त्याबद्दल दुःख होत असून खेद वाटत असल्याचं म्हटलं आहे
बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त करत आव्हान दिले होते. बागेश्वर बाबांनी याआधी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळीही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय संतप्त झाला होता. त्यानंतर आता त्यांनी साईबाबा यांच्याविषयी केलेल्या विधानाचे पडसाद देशभरात उमटले. देशभरात त्यांच्याविरोधात टीका करण्यात आली. विशेष म्हणजे हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. त्यानंतर अखेर बाबांना ट्विटरवर माफी मागितली आहे.