Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल लेखाधिकारी यांना वीस हजाराची लाच घेताना लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले

 जळगाव दि २६:-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल जि. जळगाव येथील आलोसे रविंद्र भाऊराव जोशी, लेखा अधिकारी,  वर्ग-२ याने प्रथम ३६,५००/-रूपये व तडजोडीअंती २०,०००/-रुपये लाच स्विकारली म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने त्याला ताब्यात घेण्यात आले.
           यातील तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे असलेल्या मे.सप्तश्रृंगी माता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, दहिवद ता.अमळनेर जि.जळगाव या संस्थेच्या नावे आदिवासी मुलांचे वस्तीगृह (नविन) चोपडा ता.चोपडा या वस्तीगृहास सन-२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात वस्तीगृहात लागणारे दैनंदीन भोजनाचा ठेका घेतलेला होता. त्यांनी वर्षभर सदर वस्तीगृहास पुरविलेल्या भोजन ठेक्याचा मोबदला म्हणून पत्नीच्या नावे असलेल्या संस्थेच्या बँक खात्यामध्ये एकुण ७३,००,०००/-रुपये डी. डी. द्वारे अदा करण्यात आलेले आहेत. सदर वर्षभराचे सर्व भोजन ठेक्याचा मोबदला म्हणून एकुण ७३,००,०००/-रुपये बँकेच्या माध्यमातून अदा करून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष आलोसे यांनी एकुण ७३,००,०००/-रुपये रकमेच्या अर्धा टक्का प्रमाणे प्रथम ३६,५००/-रुपये व नंतर तडजोडीअंती २०,०००/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाच रक्कम आलोसे यांनी स्वतःपंचासमक्ष एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल कार्यालयातील त्यांचे स्वतःचे कक्षात स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
         सापळा पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक, सापळा व तपास अधिकारी एन. एन. जाधव, पोलिस निरिक्षक, सापळा पथक पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, पो. कॉ. सचिन चाटे, कारवाई मदत पथकातील पो. नि. संजोग बच्छाव, ला. प्र. वि. जळगाव स. फौ. दिनेशसिंग पाटील, स. फौ. सुरेश पाटील, पो. हे. कॉ. अशोक अहिरे, पो. हे. कॉ. सुनिल पाटील, म. पो. हे. कॉ. शैला धनगर, पो. ना. जनार्दन चौधरी, पो. ना. किशोर महाजन, पो. ना. सुनिल वानखेडे, पो. ना. बाळु मराठे, पो. कॉ. प्रदिप पोळ, पो. कॉ. अमोल सुर्यवंशी, पो. कॉ. प्रणेश ठाकुर यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, एन. एस. न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.