Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अक्कलकुवा येथे मोदी@9 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकार ने देशात नऊ वर्ष यशस्वी पूर्ण केल्या बद्दल जनसंपर्क अभियान

अक्कलकुवा दि १२(प्रतिनिधी)
अक्कलकुवा तालुका, ग्रामीण व मोलगी शहर मंडळ आढावा बैठक संपन्न झाली.प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये तथा भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या सुचनेनुसार अजय भोळे नंदुरबार जिल्हा प्रभारी तथा सचिव महाराष्ट्र प्रदेश भाजपा यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, अनूसुचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेशदादा पाडवी, यांचा उपस्थितीत अक्कलकुवा शहर, ग्रामीण व मोलगी या तीनही मंडलाची ची बैठक संपन्न झाली.मोदी @9 देशाचे लाा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा सरकार ने नऊ वर्ष यशस्वी पूर्ण केल्या बद्दल जनसंपर्क अभियान,पत्रकार परिषद, जेष्ठ कार्यकर्ते संमेलन,महा रॅली,लाभार्थी संमेलन,मोर्चा व आघाडी बैठक असे कार्यक्रम राबविण्या साठी अजय भोळे यांनी सखोल माहिती दिली व कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकी साठी सज्ज रहावे व बुथ मजबूत करावे असे आव्हान केले.
             बैठकीचे आयोजन कूबेर पार्क येथे झाली यावेळी बैठकीला भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी,सरचिटणीस बळीराम पाडवी, प्रदेश सदस्य पंकज पाठक, अक्कलकुवा विधानसभा प्रभारी कपिलदेव चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी,मंडलाध्यक्ष विनोद कामे शहादा विधानसभा निवडणुक प्रभारी कैलास चौधरी, तालुका व शहर पदाधिकारी, जि, प, सदस्य,
प.स.सदस्य,सरपंच, ग्रामपंचांयत सदस्य,,शक्ती केंद्र ,बूथ प्रमुख,प्रभारी,विस्तारक व कार्यकर्ते उपस्थित होते