श्री संत सावता माळी युवक संघामध्ये तरुणांनी,महिलांनी सहभागी व्हावे- सचिन भाऊसाहेब गुलदगड
श्री संत सावता माळी युवक संघाच्या १ जुन रोजी १८ व्या वर्धापन दिनानिमीत्त समाजबांधवांनी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत.
नगर- १ जुन २००५ रोजी श्री संत सावता माळी युवक संघाची स्थापना महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या शहरातून केली व आज १ जुन २०२३ रोजी श्री संत सावता माळी युवक संघ देशभर काम करत आहे, संघाच्या माध्यमातुन संत शिरोमणी सावता महाराजांचे जन्मस्थान,कर्मस्थान, समाधिस्थान असलेले “अरण” तालुका-माढा,जिल्हा सोलापूर यास तिर्थक्षेत्राचा “अ” वर्ग दर्जा मिळावा याकरीता वेळोवेळी सरकारदरबारी प्रयत्न चालु आहेत. त्यासाठी विवीध जिल्ह्यांतून पायी दिंडी, दोन चाकी , चार चाकी दिंडीचे आयोजन केले जाते.
फुले दाम्पत्यास “भारतरत्न” पुरस्कार मिळावा याकरीता माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस साहेबांना भेटून मागणी करण्यात आली होती.महाराष्ट्र सरकार कडुन केन्द्र सरकारकडे तसा अधिकृत प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.
महात्मा ज्योतीबाफुलेंना ११ मे १८८८ रोजी मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने “महात्मा” हि पदवी देण्यात आली होती, तो दिवस श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने “११ मे महात्मा दिन” म्हणुन देशभर २०१६ यावर्षांपासुन साजरा केला जातो.
फुले दाम्पत्याचे विचारांचा देशभर प्रचार प्रसार होण्याकरीता संघाच्यावतीने महात्मा फुले लिखित शेतकर्यांचा असुड,गुलामगिरी , ब्राम्हणाचे कसब,छत्रपती शिवरायांचा पवाडा आदि पुस्तकांचे, ग्रंथाचे जाहिर वाचन करण्याबरोबरच मोफत वाटप करण्यात येते.
संघाच्या माध्यमातुन राज्यभर विवीध आरोग्य शिबीरे आयोजित केली जात असतात. जसे मोफत मोतीबिंदु शस्रक्रिया, दंतरोग तपासणी, रक्तदान आदी शिबीराच्या माध्यमातुन सुमारे ३३ हजार रुग्नांवर मोफत मोतीबिंदु शस्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली आहे.
संघटनेच्यावतीने मेळावे , वधुवर मेळावे, सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करुन सामाजिक,शैक्षणिक,राजकिय, साहित्यिक,कला,क्रिडा,सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखणिय कार्य करणार्यांना “संत सावता भूषन” पुरस्कारांने गौरविण्यात येत असते.
समाजबांधवावर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्याकरीता,विवीध अडचणींवर मात करण्याकरीता संघटनेच्यावतीने वेळोवेळी मोर्चे,आंदोलनांचे राज्यभर आयोजन केले जात असते.
कोपर्डी प्रकरणातही पिडीत मुलींला न्याय मिळावा याकरीता सर्वप्रथम श्री संत सावता माळी युवक संघच रस्त्यावर उतरलेला होता,व जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते.त्यानंतर राज्यभर मराठा क्रांतीमोर्चे काढले गेले.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा येथे १ जानेवारी १८४८ ला काढली होती,त्या भिडेवाड्यास राष्ट्रीय स्मारक घोषीत होण्याकरीता शासन दरबारात प्रयत्नांबरोबरच चक्काजाम आंदोलन, उपोषन, रास्तारोको,जेलभरो आंदोलनांचे २००५ पासुन वेळोवेळी आयोजन केले जात आहे.
पुणे विद्यापीठास क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्यात यावे याकरीता संघाच्या वतीने २००७ पासुन विवीध आंदोलनाबरोबरच शासनदरबारी प्रयत्न केली गेली, त्याचेच फलित म्हणुन समतापरीषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ यांच्यामाध्यमातुन पुणे विद्यापीठाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापिठ नामकरण करण्यात आले आहे.
थोर संत, महापुरुषांचे विचार जनमाणसांत पोहचण्यासाठी राहुरी शहारात नाका नं ५ येथे ११ एप्रिल २००८ रोजी महात्मा फुले चौकाची स्थापना केली गेली, त्यानंतर महाराष्ट्र भर प्रत्येक जिल्ह्यात , गावागावात,वाड्यावस्त्यावर संत शिरोमणी सावता चौक, महात्मा फुले चौक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक आदि स्थापन करण्यात आले.
तरुणांनी नोकरी न करता उद्योगाकडे वळावे याकरीता श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने महाराष्ट्राभर उद्योजक मेळावे, कार्यशाळांचे आयोजन केले जात असते, त्यासाठीच TMCC ( द माळी चेंबर्स ॲाफ कॅामर्स) ची २०१७ यावर्षी स्थापना करण्यात आली आहे, TMCC च्या माध्यमातुन आजतागायत हजारो तरुन उद्योग, व्यवसायात उतरले आहेत व चांगल्या प्रकारे व्यवसाय चालवत आहेत. त्यांच्यामाध्यामातुन हजारो युवकांना रोजगार प्राप्त झालेला आहे.
संघाच्या माध्यमातुन युवक आघाडी,महिला आघाडी, वैद्यकिय,मल्ल, साहित्यिक, कला,क्रिडा,शैक्षणिक,वकिल, सांस्कृतिक, आदींच्या माध्यमातुन देशभर काम चालु आहे.
भारत देश हा कृषीप्रधान देश आहे.त्यामुळेच “महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या” माध्यमातुन
शेतकर्यांसाठी सरकारच्या योजना शेतकर्यापर्यंत पोहचवण्याच काम संघाचे पदाधिकारी अहोरात्र तन, मन,धनाने करत आहेत,त्याचबरोबर शेतकरी मेळावा आयोजित केला जात असतो.
ओबीसींच्या विवीध मागणीकरीता,प्रश्नांना, समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शासनदरबारी विवीध निवेदने सादर करण्याबरोबरच रास्तारोको, उपोषन आदींचे वेळोवेळी आयोजन केले जात असते.
श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने २०१५ या वर्षी “वृक्षक्रांती अभियान” सुरु करुन डोंगरगण याठिकाणावरुन २०१५
यावर्षांपासुन ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “वृक्षक्रांती अभियान” राबवुन महाराष्ट्रातील निवडक गाव दत्तक घेऊन विवीध ठिकांनी वृक्षारोपन केले जात असते.
कोरोणा काळातही राज्यभर मोफत मास्क, सैनीटायझर, अर्सेनीक अल्बम ३० गोळ्यांच्या वाटप करण्याबरोबरच
गरजु रुग्नांना बेड उपलब्ध करुन देन्याचे काम संघाच्या प्रत्येक पदाधिकार्यांने व कार्यकर्त्यांनी वेळोवेळी केले.
संघाच्या माध्यमातुन अशाप्रकारे प्रत्येक क्षेत्रात उल्लेखणिय,विवीधांगी,समाजोपयोगी कार्य केले जाते, अशी माहिती संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी दिली.
त्यासाठीच माळी समाजाच्या विकासाकरीता, ओबीसींच्या विवीध प्रश्नांना वाचा फोडण्याकरीता, मागण्या पुर्ण करण्यासाठी तरुणांनी , महीलांनी श्री संत सावता माळी युवक संघात सहभागी व्हावे,असे आवाहन संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले.
*अनुमोदक- प्रा.श्री.विलास देवाजी माळी,सर*
*सुरत जिल्हा संपर्कप्रमुख*