Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे,वाजत गाजत,सूरेल अभंगात गात पूण्याहून पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान

थेट पूण्याहून.....
पुणे दि १४  कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी दोन दिवसांचा मुक्कामानंतर पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे. संपूर्ण पूणे नगरी दुमदुमून निघाली आहे. ज्ञानेश्वर माऊली,संत तुकाराम, विठू नामाचा अखंड जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि अभंगाचे स्वर याने संपूर्ण पूणे नगरी भक्तीमय रसात न्हाहून निघाली आहे. 
संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा संपूर्ण दिनक्रम कसा असेल पहा.
         आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.

पालखी प्रस्थान निमित्त शहरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरांची रंगरंगोटी, विविधरंगी पुष्प सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठिक ठिकाणी पालिकेच्यावतीने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
          संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पालिकेच्यावतीने अधिकाऱ्यांच्या १२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते प्रत्येक २०० मीटर अंतरावर देखरेख करण्यासाठी मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित केली  आहे.विविध सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय,स्वयसेवी संस्थांतर्फे वारक-यासाठी नाश्ता, जेवण, निवास, औषधोपचार, आदी सोयी सुविधा स्वयंस्फूर्तीने पालखी मार्गावर व्यवस्था करण्यात आली आहे.