तळोदा दि २(ता प्र) दि.1 जुन 2023 आपल्या लाडक्या लाल परी चा 75 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात, ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रवासी महासंघ शाखा तळोदा यांचे कडून साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम एसटी चा नगर आगाराचा प्रथम वाहक लक्ष्मणराव केवटे यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यांना श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
एसटी चे पुजन करून श्रीफळ वाढवून दौलतसिंग पाडवी,वाहतूक नियंत्रक तळोदा यांचे हस्ते करण्यात आले. तर जिल्ह्याध्यक्ष प्रा.आर.ओ.मगरे यांनी एसटी बसेस ला पुष्पहार अर्पण करून यावेळी चालक आर.व्ही.जावरे,वाहक डी.एच.वळवी. प्रवासी अशोक शिंदे, दौलतसिंग पाडवी. व महिला प्रवासी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव अशोक सुर्यवंशी सर यांनी केले. तर प्रा.आर.ओ.मगरे, जिल्हा अध्यक्ष, किर्ती कुमार शहा जिल्हा उपाध्यक्ष, रसिलाबेन देसाई. प्रवासी महासंघयांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवासी महासंघाचे सचिव पंडीत भामरे यांनी केले. यावेळी अमिबेन तुरखिया. मुस्तफा हुसेन राजा बोहरा, अशोक सूर्यवंशी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.