जय हनुमान शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्था कोयलीविहीर तसेच जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर आमश्या पाडवी यांच्या वतीने अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात हिंदुहृदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरुन आमदार आमश्या पाडवी हे बोलत होते.धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे,आपले काम नित्यनेमाने सांभाळून प्रत्येकाने आपले आरोग्य कसे चांगले राहील यासाठी व्यायाम सकस आहार, चौरस आहारावर लक्ष द्यावे असे प्रतिपादन विधान परिषदेचे आ. आमश्या पाडवी यांनी केले केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तृप्ती पटले, अक्कलकुव्याच्या सरपंच उषाबाई बोरा, तालुकाप्रमुख मगन वसावे, तालुका शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन पृथ्वी सिंह पाडवी, रवींद्र चौधरी, तालुका शेतकरी सहकारी संघाचे संचालक भीमसिंग तडवी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ललित जाट, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, शिवसेनेचे शहर प्रमुख रावेंद्रसिंह चंदेल, युवा नेते कुणाल जैन, मनोज डागा आदी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते याहामोगी माता, धन्वंतरी, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दिप प्रज्वलन करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिराचे प्रास्ताविक अंकित चक्रवार यांनी केले. दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात पहिल्या दिवशी एकूण 483 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी सुमारे 200 रुग्णांचे एक्स-रे काढण्यात येऊन त्यांच्यावर 10 रोजी मुंबई येथील नामांकित अस्थिरोग तज्ञ डॉ. अबी तुराब शब्बीर चुनिया, डॉ. सोहेल खान यांनी हाडा संबंधी रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार केले तसेच 25 रुग्णांवर मुंबई येथे शस्त्रक्रिया करणार आहेत.
यावेळी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष परमार वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेकानंद बाळापुरे डॉ. अजय परदेशी, डॉ. अबरार शेख, यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराचे सुत्र संचालन सुधीरकुमार ब्राम्हणे यांनी तर उपस्थितांचे आभार महेश कुवर यांनी मानले.