सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क
मुंबई दि १२
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भटक्या जमाती, धनगर व तत्सम प्रवर्गातील कुटुंबांना अर्थसहाय्याने मेंढी/शेळी पालन योजनेचा आढावा घेतला .
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भटक्या जमाती, धनगर व तत्सम प्रवर्गातील कुटुंबांना अर्थसहाय्याने मेंढी/शेळी पालन योजनेचा आढावा आज दुपारी घेतला.
मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या या बैठकीस मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणेनुसार महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करावी, असा आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.