चक्रीवादळातील नूकसानीचे पंचनामे करा, नूकसान भरपाई द्यावी,विज सूरळीत करा - कृउबा उपसभापती हितेंद्र क्षत्रिय
June 06, 2023
तळोदा दि ७(प्रतिनिधी) तालुक्यात दोन दिवसावर प्रतीतास 65 किमी वेगाचा चक्रीवादळ आल्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेंच चक्रीवादळ मुळे शेतीसाठी उपयुक्त विद्यूत जनित्र ( डीपी) सहित विजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. शेतकरी प्रतिनिधी म्हणून तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती हितेंद्र सरवनसिंग क्षत्रिय,संचालक निखिल भाई तुरखिया, संचालक प्रल्हाद फोके,संचालक पिंटू गाढे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष योगेश मराठे,सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी यांनी समक्ष नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन पाहणी केली.शेतकरी पितांबर मंगा पाटील,दीपक मनोहर पाटील,संतोष भीमराव पाटील,कनिलाल रतिलाल पटेल,विनोद मनोहर पाटील, ह्या शेतकऱ्यांशी नुकसानी बद्दल माहिती घेतली तसेंच शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे होऊन लवकरात लवकर् शासनामार्फत मदत मिळवून द्यावी, शेतकऱ्यांचा विद्यूत पूरवठा सूरळीत करावा, जेणेकरून उभ्या असलेल्या पिकाचे नुकसान होणार नाही असे तहसीलदार निवेदन देण्यात आले.