सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क
मुंबई :दि ९ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी ट्विटरवरून देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खळबळ माजली आहे.तर दूस-या घटनेत खासदार संजय राऊत व त्यांचे बंधु आमदार सूनिल राऊत यांना फोनवरून धमकीने महाराष्ट्रात राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीच्या ट्विटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली असल्याचे वृत्त आहे. तुझा लवकरच दाभोळकर होणार अशा शब्दात ही धमकी देण्यात आली असल्याचे समजते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी मिळालेल्या धमकीचा तातडीने पाठपुरावा करावा. जर काही बरंवाईट झाले तर याला केंद्रीय गृहविभाग जबाबदार असेल.सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे शिष्टमंडळ मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचले आहे.
खासदार संजय राऊत यांनाही आज ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्या फ़ोनवरून ही धमकी देण्यात आली असल्याचे समजते.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार संजय राऊत या राज्यातील विरोधीपक्षाच्या नेत्यांना एकाच वेळी धमकी आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
राजकीय वर्तुळातून पुन्हा एक खळबळजनक बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे