Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश रोहीदास जाधव जिल्ह्यात तिसरा, रिया पवार सहावी व दिव्या पवार सातवी , अभिनंदनाचा वर्षाव

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांचे घवघवीत यशरोहीदास जाधव जिल्ह्यात तिसरा, रिया पवार सहावी व दिव्या पवार सातवी 

दापोली दि ३(प्रतिनिधी) आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षेत NMMS 2023 च्या परिक्षेत दापोली तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या परिक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून  रोहीदास तुकाराम जाधव जिल्ह्यात 3 रा तर रिया राजेश पवार जिल्ह्यात 6 वी व दिव्या राजेश पवार जिल्ह्यात 7 वी आले आहेत. या विद्यार्थ्यांना विजय भिमराव धनवडे सरांनी मार्गदर्शन केले .
        विरसई जनसेवा मंडळ संचलित विरसई विद्यालयातील हे यशस्वी  विद्यार्थी आहेत. विद्यार्थांच्या या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल अध्यक्ष सचिव व कार्यकारिणीतील सदस्य विरसई जनसेवा मंडळ मुंबई व ग्रामीण तसेच अध्यक्ष व सर्व सदस्य शालेय समिती ,पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती,मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विरसई पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. आदिवासी कमिटीचे अध्यक्ष शांताराम जाधव, उपाध्यक्ष अशोक पवार, सचिव काळूराम वाघमारे व कांगवई गांवातील आदिवासी बांधवांनी परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.