मोलगी दि१६(प्रतिनिधी) मुळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूल मोलगी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नारसिंग वळवी व अध्यक्षस्थानी सुजीत वसावे हे होते.
सर्वप्रथम वरिष्ठ महाविद्यालयच्या प्रांगणात ध्वजारोहण झाल्यानंतर शाळेच्या शिक्षिका लीला पाडवी यांनी प्रास्तविक केले. त्यानंतर शाळेतील सर्वच वर्गातील लहान- लहान बालगोपालांनी आपले मनोगत उत्कृष्टपणे व्यक्त करत उपस्थितांचे मने जिंकून घेतली. त्यानंतर शाळेचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिना विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी
डॉ. इनेश वसावे, डॉ. रोहित वसावे, अड.अमरसिंग वसावे, अड. दिनेश वसावे, दिपक वसावे, दिनकर वसावे, वासुदेव बोरदे, पवन पाटील, प्रदीप पाडवी, राजू यादव, उदय गावीत, अनिल तडवी, अरविंद वसावे, महेन्द्र वाडीले, योगेश बोरदे, शरद पाडवी, अतुल पाडवी, भिका वळवी, अजय तडवी, बाज्या वसावे, वनसिंग वसावे, विनायक वसावे, अनिल नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या कर्मचाऱ्यानी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर वसावे यांनी तर आभार मनीषा वसावे यांनी मानले.