Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पाचोरा येथील पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा तळोदा तालूका मराठी पत्रकार संघा तर्फे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्रीकडे निषेध नोंदवला

तळोदा दि १३(प्रतिनिधी) पाचोरा जि.जळगांव येथील पत्रकार संजय महाजन यांना गावगुंड यांनी केलेल्या निर्घृण मारहानीचा निषेधार्थ तळोदा तालूका मराठी पत्रकार संघा तर्फे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
            निवेदनाचा आशय असा जळगांव जिल्हयातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना अज्ञात इसमांनी बेदम मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सर्वप्रथम आम्ही या घटनेच्या तीव्र शब्दात निषेध करतो.
         पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांची काही दिवसांपूर्वी पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यात आमदाराने पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी दिली होती. याबाबत कुठलीही कारवाई न झाल्याने आता दिलेल्या धमकीप्रमाणे पत्रकाराला भररस्त्यात मारहाण करण्यात आली आहे, असे सांगितले जात आहे. रिपोर्टींग करुन घरी जात असताना त्यांना काही जणांनी अडवून त्यांना जबर मारहाण केली आहे.
           मुख्यमंत्र्यांवर टिकात्मक लिखाण केल्यामुळे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी त्यांनी केलेल्या शिवीगाळाचे समर्थन देखील केले होते. पत्रकार संदीप महाजन यांना त्यांच्यावर हल्ला होणार अशी भीती असल्याने त्यांनी 5 दिवसांपासून त्यांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले होते, परंतु पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले नाही. अखेर पत्रकार संजय महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.
         हि घटना पुरोगामी महाराष्ट्राला अत्यंत लाजिरवाणी आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती व परंपरा नाही. अनेक पत्रकारांनी राज्यकर्त्यांवर प्रखर शब्दात टीकात्मक लेखन केले आहे. परंतु, राज्यकर्त्यांनी व राजकारणातील व्यक्तींनी ते सकारात्मक घेऊन पत्रकारांबद्दल कधी आकस व द्वेष बाळगला नाही. मात्र, महाराष्ट्रात अशा घटनांमुळे राजकारण्यांकडून गुंडशाही व झुंडशाहीची नवी संस्कृती रूढ होते की काय?, अशी आम्हा पत्रकारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणणाऱ्या पत्रकारांना राजकीय व्यक्ती किंवा सत्ताधाऱ्यांवर टीकात्मक लिखाण केल्याने अशा पद्धतीने जर मारहाण होत असेल तर लोकशाहीचे संरक्षण करणारे लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, राजकीय व्यक्ती हेच लोकशाहीच्या जीवावर उठले आहेत, असा प्रश्न मनात उपस्थित होतो. पत्रकार संजय महाजन यांचे जर काही चुकले असेल किंवा त्यांच्या मताशी जर कुणी असहमत असेल तर त्यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्या विषयावर चर्चा करायला हवी होती. त्यांना त्याबाबत समज देता येत होती. मात्र अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन पत्रकारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा जर कुणी करत असेल तर शासन व प्रशासन म्हणून आपण देखील पत्रकारांच्या संरक्षणासाठी कटिबद्धता दर्शवावी. पत्रकार संजय महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर व त्यामागील सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे आपणाकडे करत आहोत.यावेळी संघाचे अध्यक्ष सुनील सुर्यवंशी, हंसराज महाले भरतं भामरे,नरेश चौधरी,किरण पाटील डॉ नारायण जाधव उपस्थित होते