• आजची गझल • (भाग ४५ )
काडी काडी वेचत गेले
तोंडावरती मस्त तजेला हाच दागिना मानत गेले
गुलाब बघुनी काट्यामध्ये रीत जगाची समजत गेले
आई होता, बाळांसाठी जीवन सारे झिजवत गेले
उडून गेली पिल्ले तेव्हा एकाकीपण रडवत गेले
मनासारखे घडून यावे असेच नेहमी वाटत गेले
कठीण काळी संसाराला धैर्याने मी रेटत गेले
भांडीकुंडी पसाऱ्यास मी प्रपंच माझा मानत गेले
प्रत्येकाचा हट्ट पुरवण्या काडी काडी वेचत गेले
आनंदाला शोधायाला कुठे कुठे मी हिंडत गेले
मनासारखे झाले तेव्हा तुझ्यासोबती नाचत गेले
प्रगती झाली फारच तेव्हा ईश्वरास मी मानत गेले
अधोगतीने खचल्यावरती दुःख सारखे टोचत गेले
लाख संकटे झेलत जगले, जगण्यासाठी सोसत गेले
हरली नाही हिंमत केव्हा पदराला मी खोचत गेले
सौ. शशिकला बनकर
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=