बोरद दि १७ ( प्रतिनिधी )
ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषि औद्योगिक संलग्न कार्यक्रम या उपक्रमाच्या माध्यमातून गेले २ महिने पासून धमाणे तालुका शिंदखेडा या गावात कार्यरत असणाऱ्या शासकीय कृषि महाविद्यालय,नंदूरबार येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी धमाणे गावात शेतकऱ्यांचा मार्गदर्शनासाठी कृषि चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.
त्यात शासकीय कृषि महाविद्यालय नंदूरबार येथील कृषि तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन घेतांना विविध अडचणीनां सामोरे जावे लागते त्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण केले . तसेच या चर्चा सत्रात कृषि विद्यार्थ्यांनी अनेक विषय मांडले .कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. यू बी होले (सहयोगी अधिष्ठाता शा. कृ. महाविद्यालय नंदुरबार) या प्रसंगी मार्गदर्शन करताना पिकांवरील कीटकांची जैविक नियंत्रण कसे करावे त्याकरीता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध जैविक औषधांबद्दल माहिती दिली .
तसेच त्यांना बिज प्रक्रिया म्हणजे काय आणि ती कशी करावी यासाठी बीजप्रक्रियावरती प्रात्याक्षिक करून दाखवले
या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरपंच सुरज पाटील,पोलिस पाटील निलेश पाटील हे होते तसेच कृ. म. नंदूरबारचे प्रा. आर. बी. शेंडे ( रावे चेअरमन ) डॉ. व्ही. के. बलसाने ( कार्यक्रम अधिकारी )यांनी सोलर पॉवर पंप याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.कृषिदूत किरण देवकते सुत्र संचालन, मयंक अहिरे, प्रतिक मूर्तडक, संकेत गांगुर्डे, श्रेयश बेडसे, ऋषिकेश पवार तसेच गावातील समस्थ शेतकरी मंडळी उपस्थित होती .