Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा येथे भाजपा स्थापना दिवस निमित्त कार्यालयात आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण

तळोदा दि ६(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त  आमदार व शहराध्यक्ष कार्यालय येथे भाजपाच्या झेंडा फडकवून स्थापना दिवस साजरा करण्यात आला.प्रथम भाजप शहराध्यक्ष योगेश चौधरी यांच्या जनसंपर्क कार्यालय कल्पना टाकीज रोड येथे सकाळी 10:30 तसेच 11वा आमदार राजेशदादा पाडवी यांचे जनसंपर्क कार्यालय , बिरसा मुंडा चौक तळोदा येथे भाजपचा झेंडा फडकवून स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
           कार्यक्रमाची सुरुवात भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीं व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ कलाल,कांतीलालभाई चावडा, श्रीमती.झिरुबाई विजय वाघ,श्रीमती. रसीलाबेन देसाई बंधुभगीणींना स्नेह वस्त्र श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रदेश महामंत्री तथा जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांच्या आदेशानुसार शहरात कार्यकरामाचे नियोजन करण्यात आले. यावेळी आमदार राजेशदादा पाडवी यांचे हस्ते पार्टी संहितेनुसार पक्ष ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत वाणी,शहर मंडल अध्यक्ष योगेश चौधरी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी ,माजी उपनगराध्यक्ष सौ.भाग्यश्री चौधरी प्रधानमंत्री आत्मनिर्भर अभियानाचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या वेळी जिल्हा चिटणीस तथा बूथ सशक्तीकरण अभियानाचे संयोजक हेमलाल मगरे,  तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी,ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, कल्पेशभाऊ चौधरी,माजी नगरसेविका अंबिका शेंडे जिल्हा उपाध्यक्ष सौ.प्रियंका सोनार,रसीलाबेन देसाई, भारतीबाई कलाल,भरत मक्कन चौधरी, शक्ती केंद्रप्रमुख तथा माजी नगरसेवक रामानंद ठाकरे,जालंधर भोई, रमेश नारायण पाटील,दीपक जीवन चौधरी,सर्व बूथ प्रमुख आदिवासी आघाडीचे दारासिंग वसावे, दरबारसिंग पाडवी,,विस्तारक कमल परदेशी,सुनील परदेशी,सरचिटणीस पंकज तांबोळी, चिटणीस गोकुळ पवार, उपाध्यक्ष राजकपूर मगरे,माजी नगरसेवक गौरव वाणी,दीपक पाडवी,योगेश चव्हाण, आंबालाल साठे,ईश्वर पोटे,जीवन आहिरे,गबा आहिरे,दीपक कलाल,अनिल परदेशी,घनशाम कलाल,अजय परदेशी, विविध आघाडी,मोर्चा,सेलचे अध्यक्ष तथा सदस्य ,अरविंद प्रधान,धनराज पाडवी,कौशल सवाई,मनोज परदेशी,गणेश चौधरी,राकेश चौधरी समवेत कार्यकर्ते उपस्थित होते.