अक्कलकुवा दि ४(प्रतिनिधी)
अक्कलकुवा येथील इन्व्हटर्र बॅटरी चोरी प्रकरणी पाच जणांना अक्कलकुवा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
अक्कलकुवा येथे कगेल्या आठवड्यात सीतानगर येथील मेन रोड लगत असलेले जिया ऑटो इलेक्ट्रिक वर्कर्स बॅटरी इन्व्हर्टर सेल अँड सर्विसच्या गोडाऊनचे पत्रे उचकटून नवीन व जुन्या बॅटऱ्यांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती सुमारे ५०-६० लहान मोठ्या, तसेच वाहनाच्या बॅटऱ्या दिड लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरीला गेले होते. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत करीत होते. पोलिसांनी चोरटयांना जेरबंद केले. आहे.यात पाच संशयित आरोपींना पकडण्यात आले आहे. यात जुनेद वली मोहम्मद मकरानी (वय २१, रा. सीतानगर), अजय उर्फ चना चिराग वळवी (वय २३,रा. सीतानगर), योगेश हरीश माळी (वय ३५, रा. सेलंबा ता. सातबारा गुजरात), आरबाज अकिल पिंजारी (वय २२ रा. सेलंबा ता. सागबारा गुजरात ), मोहसिन अली निसार अली मकरानी (वय ३३, रा. मकरानी फळी अक्कलकुवा ), दोन संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. सदर कारवाई नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत, प्रभारी पोलिस निरीक्षक राजेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, पोलिस नाईक किशोर वळवी, अतुल गावीत, कपिल बोरसे, देवीदास विसपुते, पोलिस कॉ. गिरीश सांगळे, प्रशांत यादव, दीपक पाटील, अविनाश रंगारे, आदिनाथ गोसावी यांच्या पथकाने केली. सदर आरोपींकडून ३८ बॅटऱ्या हस्तगत झाल्या आहेत.