तळोदे दि ४(प्रतिनिधी) तळोदा येथे महावीर जयंती निमित्त विश्व हिंदू परिषद सेवा विभाग तळोदा तर्फे पाणपोईचे उद्घाटन
दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी भगवान महावीर चे जयंती निमित्त पाणपोईचे उद्घाटन जैन समाजाध्यक्ष प्रवीण शेठ जैन व विश्व हिंदू परिषद प्रखंड उपाध्यक्ष राजन रतिलाल पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जैन समाज पंच अशोक जैन, कालू भाई जैन, मुकेश जैन, आदीसह समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले की,विश्व हिंदू परिषद नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येक प्रखंडात किमान चार-पाच पानपोळ्या सुरू करत असते त्यातला एक भाग म्हणून भगवान महावीर जयंती निमित्त तळोदा येथे पानपोईचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रवीण शेठ जैन म्हणाले की विश्व हिंदू परिषदेचे उपक्रम हे जनहिताचे असतात याप्रसंगी प्रखंड अध्यक्ष प्रा राजाराम राणे म्हणाले की, विश्व हिंदू परिषद अजून लगेच दोन दिवसांनी पाणपोळ्यांचे उद्घाटन करणार आहेत गरजू पर्यंत पाणी पोहोचवणे हेच आमचे कर्तव्य आहे. या कार्यक्रमासाठी महेंद्र लोहार, गणेश मोरे, संदीप सुगंधी, किशोर मराठे, सचिन उदासी, राजू शाह, संतोष शिंपी, उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सेवा प्रमुख डॉ शांतीलाल पिंपरे, प्रखंड मंत्री ऋषिकेश बारगळ, धीरज कलाल, दिपक लोहार, बी एस कलाल, मुकेश जैन, पवन शेलकर, यांनी प्रयत्न केले.