जिवंतपणी पेन्शन द्या, मरणानंतर नको :- सुशिलकुमार पावरा
कर्मचाऱ्यांना मृत्यू नि-सेवा ग्रॅजूूटी लागू करण्याचा शासन निर्णय
दापोली दि ६(प्रतिनिधी) सन 2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन आणि मृत्यू-नि सेवा ग्रॅज्युटी लागू करण्याचा निर्णय शासनाने काढला आहे.या निर्णयानुसार कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळणार नाही,तर कर्मचारी मेल्यानंतर वारसाला फक्त 10 वर्षे पेन्शन मिळणार आहे.कर्मचा-यांना मेल्यानंतरच पेन्शन लागू करू नका,तर तो जिवंत असेपर्यंत ही पेन्शन द्या,मेल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी पेन्शन द्या,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
फॅमिली पेन्शन आणि मृत्यू सेवा ग्रॅजूटी नूसार आता कोणताही कर्मचारी रिटायर होण्यापूर्वी मृत झाल्यास त्याच्या परिवाराला शेवटच्या पगाराच्या 50% दराने दहा वर्ष आणि त्यानंतर 30% दराने पेन्शन मिळेल.कर्मचाऱ्याला कोणत्याही कारणाने आजार वा अन्य कारणाने दवाखाण्यात उपचार घेण्याची व त्यातून शासन सेवा करणे शक्य झाले नाही तर रुग्णता पेन्शन मिळेल.कर्मचाऱ्यांच्या मृत्यू नंतर शेवटच्या पगाराच्या प्रमाणात जास्तीत जास्त 14 लाख रुपयापर्यंत ग्रॅज्युटी मिळेल. रिटायर झाल्यावर सुध्दा जुन्या कर्मचाऱ्यांप्रमाणे14 लाख रूपया पर्यंत ग्रॅज्युटी मिळेल.
मात्र फॅमिली पेन्शन घ्यायची असल्यास डीसीपीएस,एनपीएस खात्यात जमा असलेल्या रक्कमेमधील शासनवाटा रक्कम मिळणार नाही.
सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारमय आहे.2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी ,या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी 7 दिवस राज्यभर संप पुकारला होता.त्या संपाचा,आंदोलनाचा आवाज दाबण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी कर्मचारी मेल्यानंतर पेन्शन देण्याचा शासनाने निर्णय काढला आहे. जूनी पेन्शन योजना लागू करावी,यासाठी कर्मचाऱ्यांनी आपला लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे.असे आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केले आहे.