शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर.
कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. चंद्रपूर यांना तात्काळ निलंबित करुन त्यांनी दिलेल्या अल्पसंख्याक शाळेतील नियमबाह्य मान्यता प्रकरणांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्याकडे शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तसेच माजी शिक्षक आमदार ना गो.गाणार यांनी केली आहे
आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मी केलेल्या तक्रार वजा निवेदनांची दखल घेण्यात आली नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केला जाणारा निष्काळजीपणा व दिरंगाई अत्यंत घातक स्वरुपाची असून. भ्रष्टाचारास प्रोत्साहन देणारी आहे.
चंद्रपूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी रविवार दि. ०५/०३/२०२३ ला आपल्या घरी, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. चंद्रपूर, वरिष्ठ लिपिक, खाजगी शाळेतील लिपिक, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिक व परिचर इत्यादी अधिकारी / कर्मचाऱ्यांना बोलाविले त्या ठिकाणी अल्पसंख्याक शाळेतील सुमारे ४० नियुक्ती मान्यता प्रकरणे निकाली काढण्यात आली. सदर मान्यता प्रकरणात अधिक्षकांनी निर्देशित केलेल्या त्रुटयांकडे व शासनाच्या दि. ०२ फेब्रुवारी २०२३ च्या पत्रातील तरतूदीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. या सर्व मान्यता प्रकरणाचे आदेश त्याच दिवशी दि. ०५/०३/२०२३ ला तयार करण्यात आले. परंतू मान्यता आदेशावर दि. ०३/०३/२०२३ हा दिनांक टाकण्यात आला. या आदेशाची नोंदसुध्दा जावक रजिस्टरवर करण्यात आली. हा सर्व गैरप्रकार व दुर्व्यवहार उपस्थित अधिकारी / कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये घेवून केला आहे. उपरोक्त प्राप्त माहिती ही अत्यंत गंभीर स्वरुपाची असून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा कळस गाठणारी आहे. त्यामुळे या प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करणे अत्यावश्यक आहे. शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर यांनी दि. १६ मार्च २०२३ च्या पत्राद्वारे शिक्षणाधिकारी व वर्ग २ चे दोन अधिकारी यांची चौकशी समिती गठीत केली. सदर चौकशी समिती या फौजदारी स्वरुपाच्या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यास असमर्थ आहे. कारण सदर गुन्हयात सहभागी असलेले अधिकारी वर्ग-१ व वर्ग-२ चे अधिकारी असून त्यांना सहकार्य करणारे कर्मचारी हे शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यरत आहेत. त्यामुळे नियुक्त केलेल्या
समितीवर गुन्हा करणाऱ्या अधिकारी व कर्मचान्यांचा दबाव आहे.या प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी एसआयटी मार्फत चौकशी करणेच अत्यावश्यक आहे. त्याशिवाय सदर भ्रष्टाचार उघडकीस येवूच शकत नाही.
आपणास पुनःश्च विनंती करण्यांत येते की, मा. कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. चंद्रपूर यांना तात्काळ निलंबित करून त्यांनी दिलेल्या अल्पसंख्याक शाळेतील नियमबाहय मान्यता प्रकरणांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावे.