नंदुरबार दि ९ (प्रतिनिधी)नंदुरबार शहराबाहेर नवापूर वळण रस्त्यालगत साक्रीनाका परिसराकडे जाणाऱ्या एक आड रस्ता आहे त्या रस्त्यावरच अत्यंत एकांतात निर्जन स्थळी उमापती महादेव मंदिर आहे. या मंदिरालगत आज रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदर घटना कौटुंबिक वादातून घडली असल्याचे समजते.
वृत्त वा-यासारखे शहरभर पसरली लागलीच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किरण कुमार खेडकर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ज्या तरुणाचा खून झाला आहे त्या तरुणाचे नाव कृष्णा आप्पा पेंढारकर वय ४० असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांना त्याच्या डोक्यावर व पोटावर अन्य ठिकाणी गंभीर जखमा आढळून आल्या .
या घटनेचा अधिक तपास म्हणून मृतदेह तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या खून प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. नंदुरबार पोलिस खुनाचा अधिक तपास करीत आहे. खुनाच्या घटनेमुळे
खून प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. नंदुरबार पोलिस खुनाचा अधिक तपास करीत आहे. खुनाच्या घटनेमुळे नंदुरबार शहरात खळबळ उडाली असून या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसानी एका संशयितास अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.