Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अक्कलकुवा ग्रा.पं.३ कोटी ३४ लाख रुपयांचा गैरव्यवहार भूषण पाडवी यांच्या तक्रारीची उच्च न्यायालय खंडपीठाकडून दखल

अक्कलकुवा दि ८(प्रतिनिधी)अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी जिल्हा परिषदेने छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपीठाचा आदेशानुसारलेखा परीक्षण करून आठ जणांवर  आरोप ठेवत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. 
         या ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार भूषण किर्तीकूमार पाडवी यांनी मूंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात चौकशीची मागणी केली होती.याबात न्यायालयाने जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखापरीक्षण करून अहवाल शपथपत्र मागितला होते.त्यानसार लेखापरीक्षणात तीन कोटी ३४ लाख रुपयांच्या रकमेत गैरव्यवहार आणि १० लाख रुपयांची रक्कम थेट हडपल्याचा आरोप करून अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश काढले आहेत.
      अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीत २०१६-२०१७, २०१७- २०१८ आणि २०१८ व २०१९ या आर्थिक वर्षात गैरव्यवहार झाल्याने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तत्कालीन सहायक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या समितीने नऊ जणांची चौकशी करून चार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल जिल्हा परिषदेला दिला होता. अहवालानंतरही सातत्याने हे प्रकरण रखडले होते.
                वरील कालावधीतील ही रक्कम तत्कालीन सरपंच, प्रशासक, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे.
         गटविकास अधिका-यांना जिल्हा परिषदेने तत्कालीन प्रशासक जे. एस. बोराळे, एम. आर. देव, ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. जाधव, सरपंच उषाबाई प्रवीण बोहरा, ग्रामविकास अधिकारी आनंदा ओजना पाडवी यांच्यासह २०१६ ते २०१९ या काळातील पेसा संबंधी निधी ग्रामकोष समितीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांच्या शासकीय सुट्यांनंतर कारवाईची शक्यता आहे.