Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देशाचा स्वातंत्र्य लढ्यातील वीरांच्या यादीत नंदुरबार जिल्ह्यातील रावलापाणी संग्रामातील गूलाम महाराज, रामदास महाराज यांचा नावाचा समावेश करा असे निवेदन आमदार राजेश पाडवी यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, दिल्ली यांना दिले आहे.

तळोदा दि ३१( प्रतिनिधी)         देशातील स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी वीरांच्या यादीत नंदुरबार जिल्ह्यातील गुलाम महाराज, रामदास महाराज व रावलापाणी हत्याकांडाचा देखील समावेश व्हावा अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, दिल्ली यांच्याकडे केली आहे. 
            मतदार संघातील विकासाच्या पायाभरणी बरोबरच जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जननायकांचा खऱ्या अर्थाने सन्मान व्हावा. येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहासातील आपल्या परिसरातील जननायकांचे समाजाला स्मरण व्हावे, यासाठी सातत्याने आग्रही भूमिका आमदार राजेश पाडवी घेत असतात. 
            अशाच पद्धतीने राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, दिल्ली. यांनी जाहीर केलेल्या स्वातंत्र लढ्यातील देशातील आदिवासी वीरांच्या यादीत नंदुरबार जिल्ह्यातील  गुलाम महाराज , रामदास महाराज व रावळापाणी हत्याकांडाचा समावेश व्हावा अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांच्या वतीने  करण्यात आली. 
           गुलाम महाराज व रामदास महाराज हे एक आदिवासी नेते भारतात ब्रिटिश राजवटी विरुद्ध प्रखरपणे लढा देऊन ब्रिटिश राजवटीला सळो की पळो करणारे शूर  म्हणून ओळखले जात होते. तसेच 1943मध्ये रावळापणी हत्याकांड हि घडलेली एक भयानक घटना. आहे ब्रिटिश सैनिकांनी परिसरातील निरपराध आदिवासींना ठार केले. जालियनवाला बाग हत्याकांडचं सारखे दडपशाहीचे क्रूर कृत्य इंग्रजांनी त्यावेळी केले त्याचे सबळ पुरावे सरकारी संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत. 
         अशा,नंदुरबार जिल्ह्यातील गुलाम महाराज, रामदास महाराज व रावलापाणी हत्याकांड यांची माहिती जगासमोर यावी व राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने याची नोंद घेऊन आपल्या यादीत समाविष्ट करावी अशी मागणी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश दादा पाडवी यांनी केली.