तळोदा दि ३१( प्रतिनिधी) ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिना निमित्ताने सहारा वेलफेअर व सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदे येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय आवारात तंबाखू सेवन न करण्याची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले होते.यावेळी तळोदा तालुका तहसीलदार अधिकारी गिरीश वाखरे साहेब यांनी तंबाखू न करण्याचे आव्हान केले. त्याच बरोबर तळोदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. जि. प. शाळा पदोन्नती मुख्याध्यापक कैलास लोहार यांनी तंबाखू सेवन न करण्यावर भारूड सादर केले. त्याच बरोबर सहारा वेलफेअरचे अध्यक्ष शब्बीर मन्सूरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. येथिल उप जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय बस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांनाही शपथ दिली.या कार्यक्रमास डॉक्टर राजेंद्र चौधरी, संजूभाई शेख, प्रतिक बलसाने, आशा खिल्लारे,शीतल पाटील,दीपक फकिरा,आनंद नाईक. विनोद जावरे,एम आर खरडे, डी आर पाडवी जुबेर लशकरी उपस्थिती होते