Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत दामळदा ता शहादा येथे विविध शासकीय योजनांची माहिती व कामे एका छताखाली

शहादा दि ३१(प्रतिनिधी) दामडदा ता शहादा येथे "शासन  आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत नवीन शिधापत्रिकांना फार्म भरणे, संजय गांधी निराधार यांचे आदेश वाटप,उत्पन्नाचे दाखले,जातीचे दाखले वाटप,तसेच नवीन फार्म भरून घेण्यात आले. यासाठी नायब तहसीलदार विजय सावळे, आमदार राजेश पाडवी यांचे स्विय सहाय्यक हेमराज पवार, मंडल अधिकारी निशिगंधा सावळे व तलाठी पाटोळे मॅडम, तसेच अव्वल कारकून प्रदीप पाटील, पुरवठा सहाय्यक भगवान पाटील, तलाठी एच पी धनगर, पाडवी आप्पा, साळुंखे आप्पा, सुरेखा राठोड या तहसील कर्मचाऱ्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला, तसेच कार्यक्रम यशस्वी साठी परिसरातील उपसरपंच डॉ.विजय चौधरी दामळदा,जामचे सरपंच सुभाष वाघ,कुरंगी चे सरपंच परमेश्वर सोनवणे दामळदा सरपंच हरे रामा मालची, दामळदाचे सामाजिक कार्यकर्ते भारत माळी, कुरंगी चे उपसरपंच शत्रुघन, ग्रामपंचायत सदस्य सुनील पावरा, विनोद पावरा, गणपत ठाकरे, ओंकार माळी, यांनी परिश्रम घेतले  व कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त उत्कृष्ट महिलांच्या ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला, त्यात सत्कार मूर्ती अंगणवाडी सेविका संगीता सोनवणे, अंगणवाडी सेविका उषा वामन वसावे, मंडळ अधिकारी निशिगंधा सावळे, व तारकेश्वरी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांच्या सत्कार नायब तहसीलदार विजय साळवे यांनी केला तर निशिगंधा सावळे यांचा सत्कार ट्रॉफी सन्मानचिन्ह डॉक्टर विजय चौधरी यांनी केला सरपंच हरे राम मालचे यांनी संगीता सोनवणे यांच्या ट्रॉफी देऊन सत्कार केला तसेच उषा वसावे यांच्या सत्कार जामचे सरपंच सुभाष वाघ यांनी ट्रॉफी देऊन केला.  यावेळी  शिधापत्रिका 277 लाभार्थी नी नाव नोंदणी केली. तर संजय गांधी विधवा वेतन 11 लाभार्थी आदेश वाटप करण्यात आले.