धडगाव दि २९(प्रतिनिधी) जिल्ह्यातील कूपोषण हद्दपार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सूप्रिया गावीत यांनी धडगाव येथे केले.
जागतिक पोषण दिनिमित्ताने " " रेच ईच् चाइल्ड " संस्थाचे वतीने धडगाव शहरातील एस व्ही ठक्कर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदूरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावित होत्या, यावेळी सुप्रियाताई यांनी आपल्या भाषणातून कुपोषण जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भगरचे उत्पादन घेतले जाते,मगर पौष्टिक आहे त्यामुळे लहान बालकांना भगरचे पदार्थ खाऊ घातल्याने मातेला आणि होणा-या बाळाला चांगले पोषक तत्वे मिळणार आहे. आरोग्यच्या दृष्टीने याठिकाणी चांगल्या दर्जाचे आयसीयू उभारण्यासाठी प्रयत्नशील असून तशी मागणी राज्य सरकारकडे आम्ही करणार आहोत.