Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खासदार संजय राऊत यांच्यावर नाशिक येथे गून्हा दाखल

नाशिक दि १५(प्रतिनिधी) उबाठा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर,हे सरकार बेकायदेशीर आहे, प्रशासनाने आदेश पाळु नयेत असे जाहीर वक्तव्य केल्याबद्दल नाशिक येथे गून्हा दाखल करण्यात आला आहे.
                     नाशिक पोलिसांनी खा संजय राऊत यांच्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फेसबुकवर पोस्ट करीत श्री राऊत यांनी म्हटले आहे की,गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे "गठन"बेकायदेशीर ठरले आहे .व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्या पर्यंत सगळेच घटना विरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे.बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत . भविष्यात खटले दाखल होतील.असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का?सरकारने थेट गुन्हाच दाखल केला.असे प्रश्न उपस्थित करत मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे.या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल.असे जाहीर केले आहे.