सातपुडा मिरर......
रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी झाली आहे. 2 जून रोजी तिथीप्रमाणे तर 6 जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून आज गणेश पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
रायगडावर राज दरबारमध्ये 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. त्यावेळी असलेल्या दरबाराचं चित्र उभं केले आहे . शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झालेत. यंदा शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी चांदीची पालखी वापरली जाणार आहे. दरम्यान आज या पालखीचं पूजन करण्यात आले
तिथीप्रमाणे होणाऱ्या रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन याप्रमाणे असेल,
1 जून- गडदेवता शिर्काई पूजन, छत्रपती शंभू महाराज जयंती उत्सव, गंगासागर पूजन, संध्याकाळी पारंपरिक गोंधळ, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम
2 जून -सकाळी 7 वाजता ध्वजारोहन सोहळा, 9 वाजता शिवराज्याभिषेक सोहळा, 10.30 वाजता श्री शिवसन्मान सोहळा 11 वाजता शिवपालखी सोहळा
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती राहणार आहेत. तसेच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, श्रीमंत शाहूराजे छत्रपती, छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
तिथीप्रमाणे 2 जूनला पहाटेपासूनच या सोहळ्याला सुरुवात होईल. यानिमित्ताने चांदीच्या पालखीचे आज पूजन करण्यात आले. तसेच शिवाजी महाराजांच्या काळातील होन देखील यावेळी राज्याभिषेक सोहळ्याच्या दरम्यान वापरले जाणार आहेत. गागाभट्ट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराज हा विधी करणार आहेत.