फोटोसह मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर;
5 जानेवारी 2024 ला अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करणार
जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार : दिनांक 9 जून 2023 (जिमाका वृत्त) भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या छायाचित्रासह मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात 1 जून, 2023 ते 16 ऑक्टोंबर, 2023 पुनरिक्षण पुर्व कार्यक्रम निर्धारीत केला असून दि. 17 ऑक्टोबर, 2023 ला प्रारूप यादी तर 5 जानेवारी, 2024 ला अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे हा कार्यक्रम विहीत कालमर्यादेत अचुक पुर्ण करावायाचा आहे.
या कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात 1 जुन, 2023 ते 20 जुलै, 2023 दरम्यान मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकार व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया 21 जुलै, 2023 ते 21 ऑगस्ट, 2023 दरम्यान करण्यात येणार आहे. दिनांक 22 ऑगस्ट, 2023 ते 29 सप्टेंबर, 2023 मतदान केंद्राचे तर्कशुद्धीकरण, पुर्नरचना, मतदार यादी, मधिल तफावत दुर करणे, अस्पस्ट, निकृष्ट दर्जाचे छायाचित्रे, सुनिश्चित करणे, प्रतिमा गुणवत्तेत सुधारणा करणे आणि विभागाची पुनर्रचना, मतदान केंद्राच्या हद्दीच्या प्रस्तावित पुनर्रचनेचे अंतिम रूप देणे, मतदान केंद्राच्या यादीला मंजूरी मिळवणे, अंतर ओळखणे आणि अशा तफावत भरून काढण्यासाठी कालबद्ध रणनीती आखण्यात आली असल्याचेही श्रीमती खत्री यांनी नमूद केले आहे.
एकत्रिकृत प्रारूप यादी 30 सप्टेंबर, 2023 ते 16 ऑक्टोंबर, 2023 नमुना 1 8 तयार करणे, 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारूप यादी तयार करणे, 17 आक्टोबर, 2023 ला एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, 17 आक्टोंबर, 2023 ते 30 नोव्हेंबर, 2023 दरम्यान दावे व हरकती स्विकारणे, दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी विशेष मोहिमेसाठी दोन शनिवार आणि दोन रविवार ठरविले आहेत. त्यानंतर 26 डिसेंबर, 2023 पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येतील. येत्या 1 जानेवारी, 2024 पर्यंत अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे तसेच डेटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई करून 5 जानेवारी, 2024 ला अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करून आयोगाने निर्देश दिल्याप्रमाणे पारदर्शकतेबाबत उपाय योजना करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी कळवले आहे.