पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सेवा, सुशासन व गरीब कल्याणाच्या संकल्पनेला ९ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर देशभरात 'मोदी ॲट नाइन' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष एजाजभाई देशमुख तसेच उपाध्यक्ष आदिलभाई पटेल हे सांगली दौऱ्यावर असताना सांगली येथे आमदार कार्यालयामध्ये सांगली जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चाची बैठक पार पडली. अभियानाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांपर्यंत लोक कल्याणकारी योजना आणि सरकारच्या उपलब्धी पोहोचविण्यासाठी सहकाऱ्यांना अभियानाची रूपरेषा सांगून विविध सूचना दिल्या व कार्यकर्त्यांनी यांत सहभागी व्हावे असे आवाहन केले. त्याच बरोबर एजाजभाई यांची प्रदेश उपाध्यक्ष व दिपकबाबा यांची सांगली लोकसभा निवडणुक प्रमुख म्हणून निवड झाल्यबद्दल सत्कार करण्यात आला याप्रसंगी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्री.दीपकबाबा शिंदे ,मोर्चाचे प्रदेशउपाध्यक्ष आकाशा मुल्ला,प्रदेश सचिव अशरफ वांकर,जेष्ठ नेते मुन्नाभाई कुरणे,अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष शहानवाज सौदागर,ग्रामीणचे अध्यक्ष आजमभाई मकानदार,महिला आघाडी अध्यक्ष सौ.कनिजा सोलकर,माजी महापौर संगीताताई खोत,माजी.आ.नितीनराजे शिंदे,सरचिटणीस असगर शरीकमसत,कय्युम शेख,गौस पठाण,उपाध्यक्ष कीर्तीकुमार सावळवडे,उपाध्यक्ष रियाझ वंटमुरे,लियाकत शेख,अस्लम कलावंत,पापा बागवान,हबीब मुल्ला