शिवराज्याभिषेक याची डोळा याची देही पाहण्याचे पारोळ्याकरांना लाभले भाग्य
खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून रयतेचा राजा महानाट्याच्या प्रयोगाला पारोळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पारोळा दि १४ (प्रतिनिधी) गेल्या नऊ वर्षांपासून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने देशाच्या सर्वच घटकांना शासनाचा वैयक्तिक लाभ असो वा सामूहिक लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाअगोदर विविध घोटाळ्यांची चर्चा नित्यनेमाने भारतीयांना ऐकावी लागत होती. मात्र गेल्या नऊ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विविध क्षेत्रात विकासाचा सुरू ठेवलेला झंझावाताने आज देशाचे पंतप्रधान हे जगमान्य नेतृत्व सिद्ध झाले आहे. आज त्यांच्यासोबत छत्रपतींचा मावळा म्हणून काम करत असताना मी देखील गल्ली ते दिल्ली सातत्याने जनसेवेचा वसा सुरू ठेवला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरणेने केंद्राचा कारभार सुरू असून त्यांच्याकडून नव्या पिढीला अधिकाधिक प्रेरणा मिळावी यासाठी रयतेचा राजा या महानाट्याचा प्रयोग पारोळेकरांच्या सेवेत सादर करण्यात येत आहे. अशी प्रांजळ भावना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
पारोळा येथीलएन ई एस हायस्कूलच्या मैदानावर केंद्र सरकारच्या नऊ वर्ष पूर्तीनिमित्त मोदी @9 कार्यक्रमांतर्गत रयतेचा राजा हे महानाट्य सादर करण्यात आले.
सुरुवातीला भारतीय जनजाती आघाडीचे प्रदेश संघटक किशोरभाऊ काळकर, खासदार उन्मेश दादा पाटील,नगराध्यक्ष करनदादा पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी *भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार स्मिताताई वाघ यांची अमळनेर विधानसभा क्षेत्र प्रमूख, नगराध्यक्ष करन दादा पवार पारोळा एरंडोल विधानसभा क्षेत्र प्रमूख, दिग्दर्शक हास्य जत्रा फेम अभिनेते हेमंत पाटील, निर्माते जयवर्धन नेवे तसेच भाजपा तालुकाध्यक्ष ऍड. अतुल मोरे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यानंतर दहावी बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
पहिल्यांदाच पारोळा नगरी मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य महानाट्य सादर केले जात असल्याने *पारोळेकर जनतेला ही सांस्कृतिक मेजवानी दिल्याबद्दल खासदार उन्मेशदादा पाटील यांचे मी आभार मानतो अशी भावना नगराध्यक्ष करण दादा पवार* यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली.
याप्रसंगी एरंडोल तालुकाध्यक्ष ऋषिकेश पाटील, शहराध्यक्ष निलेश परदेशी, अमळनेर तालुकाध्यक्ष हिरालाल आप्पा पाटील, चाळीसगांव पंचायत समितीचे सभापती संजय पाटील, माजी सभापती दिनेश बोरसे,भाजपा सरचिटणीस सचिन गुजराथी, पारोळा भाजपा शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी,गटनेता तथा नगरसेवक बापू महाजन, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. शांताराम पाटील, शहराध्यक्ष महेश पाटील, नगरसेवक मनीष पाटील ,नगरसेवक डी बी पाटील सर, नगरसेवक भैय्या चौधरी, नगरसेवक तथा माजी सभापती अंजलीताई पवार, माजी उपनगराध्यक्ष रेखाताई चौधरी, माजी उपनगराध्यक्ष वर्षाताई पाटील उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, गौरव बडगुजर, ऋषिकेश पाटील, महापूर सरपंच विकास पाटील, मोंढाळे सरपंच अनिल पाटील, बोळे सरपंच रावसाहेब गिरासे, जितेंद्र गिरासे, नगरसेवक संजय पाटील, नगरसेवक राहुल चौधरी ,भिका चौधरी कैलास पाटील, प्रकाश पाटील, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमित सुराणा, प्रगतिशील शेतकरी मल्हार कुमार, माजी पंस सदस्य रवीभाऊ चौधरी, रवीआबा राजपूत, काशिनाथ चौधरी,सौरभ पाटील, शरद पाटील, सुधाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन पि जी पाटील, संदीप केदार सर यांनी तर आभारप्रदर्शन ऍड. मोरे यांनी मानले. आबालवृद्ध माता बंधू भगिनी, विद्यार्थी हजारो शिवप्रेमींनी या महानाट्याचा लाभ घेतला.
उपक्रमशील व्यक्तिमत्व उन्मेशदादा
खासदार उन्मेशदादा पाटील यांनी वेळोवेळी आपल्या वेगळ्या कार्यपद्धतीची छाप सोडली आहे. आज देखील पारोळासारख्या शहरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य महानाट्य आयोजित करून या ऐतिहासीक शहराला एक वेगळा वाटेवर नेण्याचा त्यांचा संकल्प कौतुकास्पद आहे.सतत उपक्रमशील असलेले खासदार उन्मेशदादा पाटील यांचे आयोजनाबद्दल अभिनंदन करतो. असे गौरोद्गार जनजाती आघाडीचे प्रदेश संघटक किशोरभाऊ काळकर यांनी यावेळी व्यक्त केले.