अक्कलकुवा दि १(प्रतिनिधी) डंपर ने भरधाव वेगाने मोटरसायकल धडक दिल्याची घटना कौली गावाजवळ घडली. त्यात मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि ३१ रोजी घडली याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की अंकलेश्वर- बऱ्हाणपूर मार्गावर अक्कलकुवा ते खापर दरम्यान कौली गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात डंपर ने मोटरसायकलस्वार एम एच 39 के-0197 ला धडक दिली. या अपघातात मोटरसायकल वरील रुस्तम मारग्या वसावे वय 24 रा. शेलटापाणी ता. अक्कलकुवा हा जागीच ठार झाला व मोटर सायकलींचे नुकसान झाले डंपर चालक अपघाताची खबर न देता पळून गेला. म्हणून मयतचे वडील मारग्या दित्या वसावे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. डंपर चालकांवर वर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे पुढील तपास पोसई रितेश राऊत हे करीत आहेत.