Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मशरूम कल्टिवेशन साठी शेतकऱ्यांनी सुकवलेला चारा जतन करावा - राजेंद्र वसावे मशरूम उद्योजक

मशरूम कल्टिवेशन साठी शेतकऱ्यांनी  सुकवलेला चारा जतन करावा - राजेंद्र वसावे मशरूम उद्योजक 

नंदूरबार दि १२(प्रतिनिधी)मशरूम शेती ही नियोजनपूर्वक शेती असून खराब झालेला चारा मशरूम कल्टिवेशनला चालत नाही.
मशरूम उद्योग करणाऱ्या  शेतकऱ्यांनी चांगला प्रतीच्या सुकवलेला चारा घरामध्ये जतन करून ठेवावा असे आवाहन मशरूम शेती करणाऱ्यांना मशरूम चे उद्योजकांनी केले आहे
मशरूममध्ये औषधी गुणधर्म असतात.
मशरूम शेती ही आपल्या देशाच्या आर्थिक पायाभरू शकते.असा उद्योग आहे.
        जर आपल्या भारत देशात मशरूम शेतीला जास्त प्राधान्य दिले तर इतर देशातून मशरूम घेण्याची गरज राहणार नाही व आपल्या देशातच मशरूम शेती करून भारतातील लाखो करोडो बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.मशरूम शेती ही घरातल्या घरात कच्चे पक्के घर किंवा आधुनिक पद्धतीने पॅक हाऊस मध्ये होणारी शेती असल्याने जास्त जागा लागत नाही.
         त्यामुळे ज्याच्याकडे जमिनी नाहीत तो पण मशरूम शेती करू शकतो व आपला आर्थिक पाया मजबुतीने उभारू शकतो.
          मशरूम शेतीसाठी लागणारा चारा,भाताच्या चारा गहू,सोयाबीन,
दादर,ज्वारी,मकईबाजरी,तुर,मुंग,
लाकूडचा भुसा व आदी चारा लागत असतो.त्यासाठी शेतकऱ्यांनी चांगला प्रतीच्या व सुकवलेला चारा घरामध्ये जतन करून ठेवणे आवश्यक असते.
 चाऱ्यावर पाऊस पडला तर चारा खराब होण्याची शक्यता असते व खराब झालेला चारा मशरूम शेतीला उपयुक्त नाही.त्यासाठी कोणताही चारा नियोजन पूर्व जतन करून ठेवावे.असे आवाहन करण्यात आले आहे.

 रचेता:- युवा उद्योजक मशरूम शेती व्यवसायिक मार्गदर्शक राजेंद्र वसावे
अधिक माहिती साठी संपर्क. मो.8980483582