शहादा दि १९(प्रतिनिधी)शहादा तालुक्यातील मुबारकपूर ग्रामपंचायत येथील प्रथम उच्चशिक्षित विद्यार्थिनी मेघा पवार या विद्यार्थ्यांनीने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील औषध निर्माण विद्या शाखेत {एम फार्मसी} या क्षेत्रात सुवर्णपदक (गोल्ड मेडल) मिळवत दैदिप्यमान असे यश संपादन केले त्यानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला
दि१९ रोजी शहादा - तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा पाडवी यांनी मेघा पवार यांचा सत्कार करत पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी मेगा पवार यांच्या मातोश्री व पिताश्री, शिक्षक वृंद यांचे देखील अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी, भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित , तालुका कार्याध्यक्ष किशोर पाटील, सुहास दादा नाईक, नामदेव पटले, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, गोपाल पावरा, सचिन पावरा, संतोष पवार, संदीप रावताळे, प्रतिभाताई बच्छाव, (शिक्षिका) परिसरातून सन्माननीय सरपंच ताईबाई राजेंद्र आहेर अरुण काशीराम वाघ गणोर विठ्ठल ठाकरे सरपंच,सुलतानपुर सरपंच मोहन आवाशे कोचरा नवनाथ ठाकरे,बहिरपुर दिलवर पवार ,टळवाई प्रकाश वाघ