Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दिल्ली येथील साक्षी हत्याकांडातीलआरोपीस फाशी देण्याची मागणी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदन देऊन केली

तळोदा दि २( प्रतिनिधी)
दिल्ली येथील साक्षी हत्याकांडातीलआरोपीस तात्काळ फशिची शिक्षा व्हावी आणि देशात “लव जिहाद बंदी” कायदा लागू होणे बाबतचे निवेदन समस्त हिंदुत्ववादी संघटनांचा प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
              निवेदनाचा आशय असा दिल्ली येथील एका निष्पाप अल्पवयीनवय वर्ष 16 साक्षी या  बालीकेवर दिल्लीत येथे निर्घुन हत्या केली आहे. सदर घटना ही संपुर्ण मानवजातीस काळीमा फासणारी असून सदर घटनेमुळे संपूर्ण भारतवर्ष जग हादरून गेले आहे.लोकशाही असलेल्या देशात स्त्री स्वातंत्र्याचे वाभाडे निघत असुन अशा प्रकारांना कायदेशिर मार्गाने प्रतीबंध घालण्याची कठोर तरतुद असतांनाही अल्पवयीन बालीका, स्त्रीयांवर होणारे अत्याचारात सतत वाढ होतांना दिसत आहे. अशा प्रकरणात दोषींना कठोर शासन देण्याचे प्रमाण अतिशय अल्प आहे त्यामुळे समाजात कायद्याची भिती राहीलेली नाही असे निदर्शनास येते.
 दिल्ली येथील घटना लांछनास्पद असुन केंद्रशासनाने अशा प्रकरणात संशोधन करून गुन्हेगाराना फाशीची शिक्षा करण्याची  तरतुद केलेली आहे अशा परिस्थितीत दिल्ली शासनाने वरील घटनेचा सखोल तपास करुन व पुरावे गोळा करुन दोषींना फाशीची शिक्षा द्यावी.
  सदर घटना हि पहिली नसून आता पर्यंत अनेक हिंदू मुलींचे प्राण यामध्ये गेलेले आहेत यासाठी लव जिहाद या विषयावर शासनाने लवकरात लवकर आभ्यास करून लव जिहाद बंदी कायदा संपूर्ण देशात आमलात आणावा आशी विनंती करत 
वरील प्रकरणाचा हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत आहोत. आमच्या तीव्र भावना केद्रीय गृहमंत्रालय व राज्य गृहमंत्रालय यांना आपणामार्फत कळविण्यात याव्यात.यामुळे संबंधित यंत्रणांना घटनेचे गांभीर्य कळेल व कायद्याचे तरतुदीनुसार जलद गतीने न्याय मिळण्यास प्राधान्य दिले जाईल.
यावेळी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री विजय सोनवणे,सौ.सीमाबाई भोई, सौ.रत्ना कलाल, सखुबाई भोई, उशाबाई भोई, लताबाई भोई, नरेंद्र पाटील, गणेश जोहरी, सनी जोहरी, विश्व हिंदु परिषदेचे सेवा प्रमुख डॉ. शांतीलाल पिंपरे, सौरभ कलाल, गणेश शिवदे, रोहीत सूर्यवंशी, मयुर भोई, राकेश भोई, संतोष वानखेडे, गोकुळ मिस्त्री, हिरालाल भोई, आकाश भोई, विहीप तालुका प्रखंड उपाध्यक्ष राजेंद्र पाडवी, विहिप प्रखंड मंत्री ऋषिकेश बारगळ, चिंतामण जोहरी, सचिन भोई, हेमंत जोहरी, भरत भोई, अमन जोहरी, हिंदु जनजागृती समितीचे राहुल मराठे उपस्थित होते.